बातमी कट्टा:- पोलीस अधिकारीवर अचानक चाकु हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. संशयिताला शनिवारी मा.न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दि 11 रोजी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा हे आपल्या मोटारसायकलीने धुळे शहरातील श्रीराम पेट्रोलपंपाकडून बारापत्थर रस्त्याकडे जात असतांना मोटारसायकलीचा कट लागल्याल्याचा कारणावरुन एकाने पोलीस उपनिरीक्षक मिर्झा यांच्यावर चाकुने सपासप वार केले.मिर्झा यांनी संशयिताचा मोबाईल मध्ये फोटो काढला. गंभीर जखमी झाल्याने मुस्तफा मिर्झा यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.शहर पोलीसांनी तात्काळ संशयिताचा शोध घेतला असता शुभम मनोहर कुटे याला जुने धुळे भागातून तात्काळ ताब्यात घेतले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने संशयित शुभम कुटे याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
