पोलीस गाडीत घेऊन जात असतांनाच पोलीसांवर हल्ला,बेड्या तोडून दोघे फरार….

बातमी कट्टा:- सराईत संशयितांनाना घेऊन जात असतांना संशयितांनी पोलीसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यात एका पोलीस अधिकारीसह चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तर दोन्ही संशयित बेड्या फरार झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार सूरत येथून नांदेडला संशयित घेऊन जाणाऱ्या पोलिसांवर संशयितांनी हल्ला केला आहे.संशयित नवप्रीत सिंह तारेशसिंह उर्फ मंनदिपसिंह जाट आणि मोहित उर्फ मनी विजय शर्मा दोन्ही राहणार पंजाब या दोघांना पिंजरा गाडीने घेऊन जात असतांना आरोपींकडून पोलीसांवर हल्ला करण्यात आला.यात एक पोलीस अधिकारी तर चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून संशयित बेड्यांसह फरार झाले आहेत.

याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असुन सदरची घटना धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे घटना घडली आहे.नांदेड जिल्ह्यातील तरोडा बुद्रुक येथील विमानतळ पोलीस स्टेशनात दाखल एका गुन्ह्यातील या दोघा संशयितांना पिंजरा गाडीत घेऊन जात असतांना महामार्गावरील कुसुंबा शिवारात चालु वाहनात हल्ला पोलीसांवर केला.झटपटीत बेड्या तोडून दोघेही संशयित फरार झाले आहेत.पोलीसांकडून संबधीत संशयितांचा शोध सुरु असुन या घटनेमुळे पोलीस दल हादरले आहे. घटनास्थळी तात्काळ धुळे तालुका पोलीसांनी धाव घेत शोध सुरु केला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: