बातमी कट्टा:- शिरपूर येथील कर्तबगार कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची तातडीने बदली थांबवण्या संदर्भात आज उपविभागीय पोलीस अधिकारी माने यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले की,पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे शिरपूर तालुक्यात आल्यापासून तर काल-परवा पर्यंतच्या सर्व गुन्हे आणि घटनांमधील तपासाची पद्धत आपण निरखून वेगवेगळ्या एजन्सींना लावून पाहिली तर याचा सखोल ऑडिट केले तर लक्षात येईल की नेमकं काय घडलेले आहे. शिरपूर तालुका हा नेहमी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची दखल घेणारा तालुका आहे. यापूर्वी देखील या तालुक्यात अशा पद्धतीने प्रयत्न झालेले आहेत परंतु कुठलाही प्रकारे राजकारण न आणता आम्हा तालुक्याच्या सुरक्षिततेसाठी शांततेसाठी न्याय हक्कासाठी अशाच पद्धतीचा अधिकारी पाहिजे आहे.हेमंत पाटील अनेक ठिकणी वादग्रस्त असतील परंतु त्यांची कामाची पद्धत सर्वसामान्य शेतकऱ्यांना पिडीतांना न्याय देण्याची आहे.

तालुक्यात कोणाचीही कसलीही तक्रार नसताना मुठभर मार खाणाऱ्या टवाळखोर यांची दखल घेऊन जर या तालुक्यावर अन्याय करणार असाल ते कदापी सहन केले जाणार नाही. तातडीने त्यांची होऊ घातलेली बदली ती थांबवण्यात येऊन त्यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणाहून त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याशिवाय हलवण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन देतांना पत्रकार रत्नदिप सिसोदिया,मिलींद पाटील,राज देशमुख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.