बातमी कट्टा:- पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही.यात पोलीसांनी कारवाईत जप्त केलेला संपूर्ण मुद्देमाल जळून खाक झाला आहे.अग्निशमनचे दोन बंब घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वरील शिरपूर तालुका पोलीस स्टेशन(सांगवी) येथे पोलीस स्टेशन बाहेर असलेल्या गोदामाला आज दि 18 रोजी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली आहे. पोलीसांनी कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल या गोदामा मध्ये ठेवण्यात येत असतो.हा संपूर्ण मुद्देमाल जळून खाक झाला आहे.पोलीसांनी अनेक कारवाई मध्ये जप्त करण्यात आलेले मोटरसायकली,वाहने,स्पिरीट, गांजासह ईतर मुद्देमाल यात जळून खाक झाला आहे.या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिरपूर येथील दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यात येत आहे.
