
बातमी कट्टा:- नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा अरुणावती नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि 18 रोजी सकाळी घडली आहे.काल दुपारपासून घरातून बेपत्ता असतांना आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दिनेश रतीलाल मोरे या 13 वर्षीय मुलाचा आज सकाळी शिरपूर शहराजवळील मांडळ शिवारात असलेल्या अरुणावती नदीत मृतदेह आढळून आला आहे.दिनेश मोरे याचे वडील रतीलाल मोरे हे शिरपूर आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे मुळगाव सावळदे असून ते शिरपूर शहरातील वरवाडे भागात राहत होते.काल दुपारी एक वाजेपासून दिनेश हा घरातून बेपत्ता होता त्याचा सर्वत्र शोध सुरु असतांना आज सकाळी त्याचा पाण्यात मृतदेह आढळून आला.दिनेश पाचवीचे शिक्षण घेत होता. काल मित्रांसोबत पोहण्यासाठी अरुणावती नदीपात्रात गेला असतांना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.