
बातमी कट्टा:- सायंकाळी झालेल्या जेवणानंतर अचानक पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलीसांना विषबाधा झाल्याची घटना घडली.60 पेक्षा अधिक पोलीसांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.अनेकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 8 रोजी सायंकाळी धुळे शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाली.सायंकाळच्या जेवणानंतर अचानक प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांना उलट्यांचा त्रास व्हायला लागला.त्यांना तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.60 पेक्षा अधिक पोलिसांना विषबाधा झाली असून विषबाधा झालेल्या पोलिसांमध्ये कोणाची ही प्रकृती गंभीर सांगितले जात आहे.मात्र विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.मात्र उपचारानंतर अनेकांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.
