प्रसिध्द उद्योगपती चिंतनभाई पटेल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

बातमी कट्टा:- मुंबई येथील सुप्रसिद्ध उद्योगपती, श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ उपाध्यक्ष चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांना त्यांच्या व्यवसाय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्याच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन आणि प्रवासी संदेश यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतनभाई पटेल यांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कारा’ने महाराष्ट्राचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते हॉटेल हयात सेंट्रिक जुहू येथे आयोजित शानदार कार्यक्रमात गौरविण्यात आले.

शिक्षण मंत्री दिपक केसरकर,।माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंग, सुदेश भोसले (पार्श्वगायिका), चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी, ईशा कोप्पीकर, शाहिद मोहम्मद रफी, सुप्रसिद्ध उद्योगपती, समाजसेवी सीएसके जैन, किशन कुमार उपस्थित होते.

जेठानी, निर्भय दूतचे संपादक बाबुलाल जैन, भाजप उत्तर भारतीय आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संजय पांडे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अखिलेश चौबे, शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रकाश सुर्वे, शंकर विरकर, शिवसेना नेते विक्रम प्रताप सिंग, प्रवीण राय, काँग्रेस उत्तर भारतीय सेलचे मुंबई कार्याध्यक्ष ऍड. अवनीश तीर्थराज सिंग, हिंदी अकादमीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पांडे आणि उद्योग, शिक्षण, चित्रपट क्षेत्रातील सर्व बड्या व्यक्ती, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माजी शिक्षण मंत्री आणि विधान परिषद सदस्य आमदार अमरिशभाई पटेल यांचे सुपुत्र तथा श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कौतुक केले. तसेच माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या शिरपूर पॅटर्न रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाने शिरपूर आणि परिसराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले. ‘शिरपूर पॅटर्न’ हा प्रकल्प देश आणि जगासमोर आदर्श ठरला आहे, असेही श्री लोढा म्हणाले.

यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या मंत्रालयाच्या अखत्यारीतील विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देताना सर्वांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सीए रमेश प्रभू, उपाध्यक्ष सुनील शर्मा, प्रवासी संदेशचे संपादक राजेश उपाध्याय यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

WhatsApp
Follow by Email
error: