प्राध्यापिका रंजना पाटील यांना पीएचडी पदवी प्रधान…

बातमी कट्टा:- दोंडाईचा ये थील पी पी बागल कॉलेज मधील प्रा. रंजना राजेंद्र पाटील यांनी संसाराचा गाडा ओढत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नुकतीच भूगोल विषयातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीचे सर्वच स्थरावरुन कौतुक केले जात आहे.


मार्गदर्शक म्हणून डॉ. मोहन राजाराम वैषयमपायांन यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर डॉ. सतिष पाटील, डॉ. संदीप भावसार, डॉ. चव्हाण सर, अमळनेर येथील प्रताप कॉलेज मधील डॉ. चौधरी सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्राध्यापिका रंजना पाटील हे मुळ दोंडाईचा येथील रहिवासी आहेत. ते माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील यांच्या भाऊजाई आहेत. अमळनेर येथील कै. निंबा बापू पाटील यांच्या कन्या असून ज्ञानोपासक शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर पाटील यांच्या बहीण आहे. प्रा. रंजना पाटील यांच्या यशाचे कौतुक माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, तसेच पी पी बागल कॉलेज मधील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांसह मित्रपरिवारातून होत आहे.

शिक्षण घेत असताना पीएचडी डिग्री मिळवली. मात्र ही मला नसून मला ज्यानी मोलाची साथ दिली त्यांचे श्रेय म्हणावे लागेल.. तसेच माझा मुलगा अजय पाटील माझी मुलगी जागृती पाटील यांचाही मोठा वाटा आहे. माझ्या यशामध्ये माझे पती, सासु सासरे, जेष्ठ, जेठानी सर्वांचे वेळोवेळी सहकार्य होते. म्हणून मी आज ही डिग्री प्राप्त केली…

रंजना पाटील, दोंडाईचा,प्राध्यापिका

WhatsApp
Follow by Email
error: