प्रा. विशाल बागुल यंग सायनटीस्ट म्हणून सन्मानीत

बातमी कट्टा:- एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालय, शिरपूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. विशाल सुरेश बागुल यांना त्यांनी त्यांच्या विषयात केलेल्या संशोधन, प्रकाशन आणि पेटंट योगदानाबद्दल सोसायटी ऑफ फार्माकोग्नोसी आणी फाय्तोकेमिस्त्री, नवी दिल्ली (Society of Pharmacognosy and phytochemistry, New Delhi) यांच्यातर्फे Young Scientist Award प्रदान करण्यात आला.

पारितोषकाचे स्वरूप रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह असे आहे. तसेच गेल्या वर्षी देखील त्यांना अश्याच कार्याबद्दल मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे करून Research Excellence अवार्ड ने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल,राजगोपाल भंडारी प्राचार्य. डॉ.संजयकुमार बारी, डॉ. प्रवीण पाटील , डॉ. राकेश मुथा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्रा. विशाल बागुल हे सेवानिवृत उपजिल्हाधिकारी श्री. हिरालाल तुळशीराम वसईकर यांचे नातू तर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर येथील प्रा. डॉ. विनायक रामचंद्र वसईकर यांचे भाचे आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: