
बातमी कट्टा:- प्रेम संबंधाच्या संशयातून घरात डांबून मारहाण करण्यात आली.कोयत्याने तुकडे करण्याचा धाक दाखवून चारचाकी कारच्या डिक्कीत कोंबून घेऊन जात असतांना पोलीसांनी अपहरण करणाऱ्या तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार धुरे येथील चितोड येथील संदीप ईश्वर गायकवाड याचे एका महिलेशी प्रेम संबध असल्याच्या संशयातून सोनगीर येथील महेंद्र नवसारे याने संदिप गायकवाड याला सोनगीर येथील सासर्याच्या घरी बोलवले. सकाळी 10 च्या सुमारास संदिप गायकवाड हा सोनगीर येथे गेला असता महेंद्र नवसारे, भुपेश कोळी व यश कोळी या तिघांनी संदिप गायकवाड याला महेंद्र नवसारे याच्या सासर्याच्या घरात डांबून बेदम मारहाण केली.त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत त्याला एम.एच 04 एक्स 4690 क्रमांकाच्या कारच्या डिक्कीत कोंबून सोनगीर येथून त्याला गोंदूर गावातून घेऊन जात असताना रस्त्यावर काम करणाऱ्या काहींना गाडीतून आवाज येत असल्याने संशय आला.संशय आल्याने नागरिकांनी चारचाकी कार अडवून चौकशी केली.यावेळी कारच्या डिक्कीत संदिप गायकवाड यांना कोंबून ठेवल्याचे उघड झाले.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.घटनास्थळी पोलीस दाखल झाले.चौकशी करत कारसह महेंद्र नवसारे याला ताब्यात घेत सोनगीर पोलीस स्टेशन येथे आणून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनगीर पोलीसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
