प्लॅस्टिकच्या कापडात होता मृतदेह , दोघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

बातमी कट्टा:- दारु पिण्याच्या बाहणा करुन त्याचा खून करत मृतदेह प्लास्टिक कापडात बांधून शेतात फेकून दिला होता.पोलीसांनी खून करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून संशयितांनी खूनाची कबुली दिली आहे. संशयिताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन खून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस स्टेशन हद्दीतील वालखेडे येथील पोलीस पाटील दिपाली वानखेडे यांनी दि 6 रोजी रात्री 9:45 वाजेच्या सुमारास नरडाणा पो.स्टे.ला फोन करुन सांगितले की,वालखेडा येथील अकिल पिंजारी यांच्या मक्याच्या शेतात एकाचा मृतदेह प्लास्टिक कापडात बांधून ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे.घटनास्थळी नरडाणा पोलीस स्टेशनचे अधिकारी पथकासह दाखल होत.त्या मृतदेहाची पोलीसांनी ओळख पटविण्यासाठी गावातील नागरिकांना बोलवून विचारपूस केली असता सदर मृतदेह साहेबराव भिमराव मोरे वय 42 यांचा असल्याचे समजले.

त्या शेतात काम करणाऱ्या मंगा उत्तम मोरे याने प्रथम मृतदेह बघितल्याने पोलीसांनी त्याची विचारपूस केली असता मंगा मोरे पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. मंगा मोरेवर पोलीसांना संशय आल्याने कसून चौकशी केली असता मंगा मोरे याने खून केल्याची कबूली पोलीसांना दिली.

मंगा मोरे याने पोलीसांना सांगितले की,मंगा मोरे यांच्या पत्नीशी मयत साहेबराव मोरे याचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता.यामुळे मंगा मोरे आणि त्याचा मित्र चेतन बारकु मोरे वय 31 रा वालखेडा याच्या मदतीने दि 5 रोजी रात्री साहेबराव मोरे यास दारु पाजण्याच्या बाहण्याने सोबत नेऊन साहेबराव मोरे याचा खून करत मृतदेह प्लास्टिक कापडात बांधून शेतात फेकून दिल्याची माहिती मंगा मोरे याने पोलीसांना दिली.नरडाणा पोलीसांनी दुसरा संशयित चेतन बारकु मोरे याला देखील ताब्यात घेतले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: