“फेंडशिप डे” च्या दिवशी काळाचा घाला..! पाण्यात बुडून मृत्यू…!

बातमी कट्टा:- फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी तलावावर गेलेले मित्र तलावाजवळ सेल्फी घेत असतांना तोल गेल्याने तलावात पडले यावेळी दोघांना वाचविण्यात आले मात्र यावेळी एका युवकाचा तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एस.डी.आर.एफ च्या पथकाने शोध मोहीम राबवून आज सोमवारी मृतदेह पाण्याबहेर काढला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील मोराणे शिवारातील हरण्यामाळ तलाव येथे मकरंद अजय पावटे वय 22 रा.वक्रतुंड सोसायटी,वाडीभोकर रोड धुळे याच्यासह कुणाल निमबड प्रशांत सोनवणे, विवेक घुगे,अक्षय पाटील आदी जण फेंडशिप डे साजरा करण्यासाठी रविवारी गेले होते. यावेळी तलावाजवळ मकरंद पावटेसह तीन मित्र सेल्फी काढत असतांना त्यांचा तोल गेल्याने तिघही मित्र पाण्यात पडले यावेळी आरडाओरड केल्यानंतर जवळील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला यावेळी दोघांना वाचविण्यात यश आले मात्र मकरंद अजय पावटे हा पाण्यात बुडाला होता त्याचा शोध घेऊन देखील तो मिळुन आला नाही.या घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी मकरंदचे कुटुंब दाखल झाले होते सायंकाळी उशीर झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. आज सोमवारी सकाळी एस.डी.आर.एफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पाण्यात सर्वत्र शोध घेत असतांना अखेर मकरंद पावटे याचा मृतदेह मिळुन आला.

WhatsApp
Follow by Email
error: