
बातमी कट्टा:- फेसबुकवर खोट्या नावाचे अकाऊंट बनवून एकाला जाळ्यात अडकून प्रत्यक्ष बोलवून त्याला मारहाण करत 40 लाखांची रोकड हिसकावून फरार झालेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.त्यांच्या ताब्यातून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर संशयितांची कसून चौकशी सुरु आहे.

दि 27 रोजी दसमेल सुखविंदर कालरा रा.पुणे यांनी निजामपुर पोलीस स्टेशनात तक्रार दिली होती.त्यात सागर पाटील,महेश पाटील व राजेंद्र पाटील यांनी त्यांचे ईतर साथीदारांसह दसमेल कालरा यांना कॉपर केबल घेण्यासाठी छडवेल शिवारातील सुझलॉन कंपनीचे पाठीमागे पैशांसह बोलावून दसमेल कालरा यांना मारहाण करुन त्यांच्या कडील 40 लाखांची रोकड असलेली काळी बॅग जबरदस्तीने हिसकावून पळुन गेले असल्याची फिर्याद निजामपुर पोलीस स्टेशनात दाखल केली होती.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कसुन चौकशी सुरु होती.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह संपूर्ण पथक चौकशी करत असतांना सदर गुन्हा हा नवरत पवार याने सागर पाटील असे बनावट नावाचे फेसबुक अकाऊंट तयार करून त्या फेसबुकवर कॉपर वायरचे फोटो टाकून सदर वायर विकण्यासाठी संपर्क क्रमांक देवुन फिर्यादी दसमेल कालरा यांना खरेदी करण्यासाठी आकर्षित करून इकबाल चव्हाण (बनावट नाव राजेंद्र पाटील),कृष्णा भोसले (बनावट नाव महेश पाटील) व इतर साथीदार यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समजले.याबाबत तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपणीय माहिती मिळाली की,सदर संशयितांनी बारडोली गुजरात येथून कार मेळ्यातून शेवरटेठस कंपनीची कार खरेदी करून राजस्थान राज्यात पळुन गेले आहे.

त्या अनुषंगाने सपोनि प्रकाश पाटील, योगेश राऊत , बाळासाहेब सुर्यवंशी यांचे वेगवेगळे पथक नेमुण संशयितांचा शोध सुरु केला.यावेळी पथकाकडून गोपणीय माहिती वरून तांत्रिक विश्वलेषणावरून संशयित हे सदर कारने चोपडाहुन शिरपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे दि 1 रोजी 11 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूरच्या जवळील चोपडा फाट्याजवळ हॉटेल सहास येथे सापळा रचला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारला थांबवली त्या कारमध्ये तीन इसम मिळुन आले.त्यांना पथकाने ताब्यात घेत विचारपूस केली असता इकबाल जाकीट चव्हाण रा.मु.पो जामदा ता.साक्री,कृष्णा अशोक भोसले रा.जामदा ता. साक्री, नुरआलम महोम्मद युसूफ सैय्यद रा.लिंबायत सुरत गुजरात असे सांगितले.गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांची अंगझडती केली असता त्यांच्याकडे 5,47,000 रूपये रोख रक्कम व 55,999 किंमतीचे पाच मोबाईल असा एकुण 6 लाख 2हजार 999 किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असून जप्त करण्यात आले आहे.

त्यांच्याकडील मोबाईलची तपासणी केली असता त्यात कॉपर केबल,गांडुळ व पैसे पाडवयाचा भोपळा व इतर प्रकारचे लोकांची फसवणूक करणारे व्हिडीओ व फोटो दिसत आहे. सदर संशयितांनी अशा प्रकारचे फसवणूक करीत असल्याचे दिसून आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, प्रकाश पाटील, योगेश राऊत,बाळासाहेब सुर्यवंशी, संजय पाटील,रफीक पठाण,प्रभाकर बैसाणे,प्रकाश सोनार, संदिप सरग,कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, योगेश चव्हाण, राहुल सानप,गौतम सपकाळ, चेतन कंखरे, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी,मयुर पाटील, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, अमोल जाधव, विलास पाटील, कैलास महाजन आदींनी केली आहे.
