
बातमी कट्टा:- फोटोग्राफी करणाऱ्या २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. २५ रोजी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे.आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, दोंडाईचा शहरातील आझाद चौक येथे राहणारा मयुर प्रकाश गुरव याचा दि. २५ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास राहत्या घरी रुमालच्या साहाय्याने गळफास लावल्याच्या स्थितीत मृतदेह भाऊ मोनू यास दिसून आला.दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पारूल अग्रवाल यांनी तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून मयूरने शहरासह परिसरात ओळख निर्माण केली होती.घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात गर्दी जमली होती. नातेवाईकांनी यावेळी आक्रोश केला होता.
