बँक कर्मचाऱ्याची बँकेच्या जिन्यामध्येच आत्महत्या…

बातमी कट्टा:- बँकेतील शिपाईने बँकेच्या जिन्यामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि २२ रोजी घडली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे येथील धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेचे कर्मचारी योगेश निकम यांनी बँकेच्या जिन्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.योगेश निकम हे बँकेत शिपाई म्हणून कार्यरत होते.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. योगेश निकम यांच्यावर बँकेचे कर्ज होते त्याप्रकरणी त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होत.योगेश निकम यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: