बंडखोरीच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी फोडले टरबूज

बातमी कट्टा:- राज्यात सुरु असलेल्या बंडखोरीच्या राजकाराणानंतर दि.25 रोजी शिवसैनिकांनी शिरपूर शहरातील मुख्य पोस्ट कार्यालय जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयासमोर टरबूज फोडून बंडखोर आमदारांचा निषेध व्यक्त केला.यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी घोषणा दिले.

दि 25 रोजी शिरपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिरपूर येथील शिवसेना कार्यालय बाहेर जमले होते.यावेळी टरबूज फोडून बंडखोर आमदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला.तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना समर्थन केले.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतसिंह राजपूत हे म्हणाले की,शिवसेना हा पक्ष नसून बाळासाहेबांनी दिलेला विचार आहे.अशी अनेक वादळ शिवसेनेने पचवली आहेत. शिवसेनेकडे त्यागातून मिळालेला वारसा आहे. असे यावेळी भरतसिंह राजपूत बोलतांना म्हणाले यावेळी उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,माजी जिल्हा प्रमुख हिंमतसिंग महाजन,विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटुसिंग राजपूत,तालुका प्रमुख दिपक चोरमले,अत्तरसिंग पावरा,तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, शहर प्रमुख मनोज धनगर,समन्वयक देवेंद्र पाटील,संघटक प्रेम कुमार चौधरी,उपतालुका प्रमुख अभय भदाणे,मंगलसिंग भोई,सुकलाल पावरा,सुनिल मालचे, स्वरूपसिंग पावरा,उपशहर प्रमुख बंटी लांडगे,योगेश ठाकरे,इंद्रिस शहा,रेहान सर,वाजिद मलक,माजी तालुका संघटक मुकेश शेवाळे,पिंटू शिंदे,रवींद्र जाधव,युवासेना उपजिल्हा युवाधिकारीअनिकेत बोरसे, तालुकाधिकारी विजय पावरा,उपतालुकाधिकारी जितेंद्र राठोड,राहुल पावरा, जगदीश पावरा,बबलू शेख,दिनेश गुरव,मंगल पावरा,युवासेना सचिव सचिन शिरसाठ,महा.वा.सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटिल,शिवसेना संपर्क कार्यालय, पोस्ट ऑफिस समोर समर्थन करण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: