
बातमी कट्टा:- धुळे अप्पर पोलिस अधीक्षकांना मिळालेल्या गोपणीय माहिती नुसार शिरपूर शहरात बंद खोलीत जुगार खेळ सुरु असतांना पोलिसांनी अचानक छापा टाकत 49 हजारांचा मुद्देमाल जप्त करत दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दि 7 रोज धुळे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ए.एस. आगरकर यांना फोनद्वारे कळविले की, त्यांना गोपणीय बातमीदार माहिती मिळाली की, शिरपूर शहरातील पाच कंदिल चौकातील बालाजी मंदिराकडे जाणा-या रोडवर अग्रसेन पत्त संस्थेच्या वरच्या मजल्यावर बंद खोलीत दिपक सुरेश अग्रवाल हा त्याच्या हस्तकांमार्फत अंक सट्ट्याचा जुगाराचा खेळ खेळत व खेळवीत आहे अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी वाचक शाखा, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथील अंमलदारांसह जावून बातमीची खात्री करून छापा कारवाई करा असे आदेशीत करण्यात आले.
त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक ए.एस आगरकर यांनी पो.स्टे. चे पोउनि संदिप मुरकुटे यांना सदर बातमीची हकीगत सांगुन सदर ठिकाणी छापा कारवाई करणे बाबत आदेशीत केल्याने पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे यांनी पो.स्टे. चे व वाचक शाखेचे अंमलदार तसेच दोन पंचांसह सदर ठिकाणी जावून छापा कारवाई केली असता त्यात अग्रसेन पत संस्थेच्या वरचे मजल्यावर ०२ हॉलमध्ये दिपक सुरेश अग्रवाल हा त्याचे १० हस्तकांसह अंकसट्ट्याचे आकड्यांवर जुगाराचा खेळ खेळवितांना जागीच मिळुन आला.छाप्यात त्याकडुन ३ हजार २४० रूपये रोख, ३५ हजार रूपये किंमतीचे ७ विविध कंपनीचे अँड्रोईड मोबाईल, ४ हजार रूपये किंमतीचे ८ बटनाचे मोबाईल, ०२ प्रिंटर, १० पॅड, २३ पेन, १४ कॅल्क्युलेटर व अंकसट्ट्यांच्या चिट्ट्या असा एकुण 49 हजार 378 रूपये किंमतीचे जुगाराची साधने, रोख रूपये व मोबाईल मिळुन आले असुन ते जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून दिपक सुरेश अग्रवाल याच्यासह त्याचे १० हस्तकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे तसेच डी.बी. पथकाचे पोहेको ललीत पाटील,पोना रविंद्र आखडमल ,पोकों योगेश दाभाडे, प्रशांत पवार तसेच वाचक शाखेचे पोहेकाँ जाधव, सोनवणे, पोना मनोज बागुल व पंकज पाटील आदींनी मिळून केली आहे.