
बातमी कट्टा:- बनावट ग्राहक पाठवून विक्रीसाठी बंदी असलेल्या बोगस एच.टी.बि.टी कापुस बियाण्यांची विक्री करतांना उघड झाले आहे.या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 30 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणवता नियंत्रक मनोजकुमार रमेश शिसोदे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे मनोजकुमार यांच्यासह गुणवता निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरातील बालाजी हार्डवेअर अँण्ड प्लंबिंग या दुकानाजवळ एक व्यक्ती बोगस बियाणे विक्री करत असल्याचे समजल्याने.कृषी विभागाच्या पथकाने एका इसमाला बनावट ग्राहक म्हणून त्याच्या कडे पाठवले यावेळी त्याचे नाव मोहनलाल चेलाराम पटेल रा.वरूळ असे सांगितले व किशोर शालीकराव पाटील व मनोज खेताराम पटेल यांच्यासाठी काम करत असल्याचे सांगितले. मोहनलाल पटेल याने सदर बनावट ग्राहकास 5 हजार रूपये घेऊन पिंक पँथर अँण्ड कंपनी गुजरात या कंपनीने उत्पादीत केलेले सिल्वर या नावाचे एच.टी.बी.टी असलेले संशयित कापूस बियाण्यांचे 11 पाकीटे प्रती पाकीट 1250 याप्रमाणे 13 हजार 750 रुपये किंमतीचे पाकिटे जप्त करण्यात आले.
संशयित बंदी असलेल्या कापूस बियाणे उत्पादन, वितरण, साठवून व विक्री केली म्हणून सदर बियाण्यांची उत्पादक कंपनी, सदर कंपनीचे मालक व जबाबदार व्यक्ती, मोहनलाल चेलाराम पटेल रा.वरुळ,किशोर शालीकराव पाटील रा.करवंद व मनोज खेताराम पटेल रा.वरूळ ता.शिरपूर या पाच ही जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.