बातमी कट्टा:-महानगरपालिका हद्दीत एका शाळेचे केंद्र दाखवून बोगस कोवीड लसीकरण दाखवून बनावट लसीकरण प्रमाणपत्र वाटप केल्या प्रकरणी पोलीसांनी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारींसह चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
धुळ्यात शिवसेना पक्षाच्या वतीने बनावट लसीकरण प्रमाणपत्र संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकांनीही खऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.बोगस लसीकरण बोगस प्रमाणपत्र संदर्भात धुळे महानगरपालिकेने अज्ञात व्यक्तीविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला होता.यावेळी धुळे शहर पोलीसांकडून तपास सुरु होता.पोलीसांनी या प्रकरणात आता धुळे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांच्यासह डॉक्टर प्रशांत पाटील, उमेश पाटील, अमोल पाथरे या चौघांना अटक केली आहे.या कारवाई मुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.