
बातमी कट्टा:- भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी (दि. १९ जुलै) रोजी धुळे ग्रामिण भाजपा जिल्हाध्यक्षपदी बबनराव चौधरी यांची नियुक्ती जाहिर केली आहे. या सक्षम आणि क्रियाशील आणि संघटनात्मक कौशल्य अवगत असल्याने बबनराव चौधरी यांना स्थान देण्यात आले आहे. या नियुक्तीने धुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहेत या माध्यमातून भाजप परिवाराशी जोडले गेलेले बबनराव चौधरी यांची राजकीय जीवनाची सुरवात १९८० मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा प्रमुख उपस्थित भाजपा स्थापना राष्ट्रीय अधिवेशनास मुंबई येथे उपस्थिती पासुन सुरु झाली आहे. सुरुवाती पासुन ते भाजप कडून १९८३ ते १९८७ मध्ये भा. ज. युवा मोर्चा शिरपूर शहराध्यक्ष झाले.

तेव्हापासून त्यांचा आलेख वाढतच राहिला. पक्षाने त्यांना गृहनिर्माण व क्षेत्र विकास (म्हाडा) महामंडळ नाशिक विभाग उपसभापतीपदाची मोठी संधी त्यांना पक्षाने दिली होती. नंतर प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणुन ही संधी दिली. सक्षम पक्ष पदाधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक असताना त्यांच्यात संघटन कौशल्य हा मोठा गुण असल्याने पक्ष कायम त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देत राहिला. मागील कालखंडात शिरपूर भा.ज. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, भाजपा शहराध्यक्ष, धुळे भाजपा जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य झाले. १९८० पासुन ते २०२३ पर्यंत ते विविध पदांवर कार्यरत आहेत. आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी काळात होणार्या लोकसभा, विधान सभा, जिप, पं.स व नगर पालिका या महत्वाचा निवडणुकाचा निमित्ताने धुळे जिल्हाध्यक्षपदी बबनराव चौधरी यांचावर विश्वास ठेवुन त्यांची नियुक्ती करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. तर ते शिरपूर वरवाडे नगरपरिषद नगर सेवक, शिसाकात व शिरपूर मर्चंट बॅन्केत व्हाईस चेअरमन होते. ते मन की बात व बुथ रचना विभाग संयोजक आहेत. त्यांनी आतापर्यंत राजकीय व विविध संस्थांच्या १९ वेळा निवडणुका लढले आहेत. त्यांनी शिरपूर विधानसभा २००४, शिरपूर नगरपालिका थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणुक, शिरपूर नगरपालिका नगरसेवकासाठी, दि शिरपूर मर्चन्टस् को-ऑप. बँक, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी शिरपूर, कृषि उत्पन्न बाजार समिती शिरपूर निवडणुका लढविल्या आहेत. त्या पैकी ५ वेळा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनी १९८३ ते आज पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विविध पदावर राहून मोर्चे, आंदोलने, निवडणुका लढविणे, पक्ष संघटना बांधणीसाठी पूर्णवेळ सक्रीय राहून शिरपूर तालुका व धुळे जिल्ह्यात पक्ष वाढविला. पक्षाच्या प्रतिकुल परिस्थितीत कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांच्या विरुद्ध लढून पक्ष वाढीसाठी वेळोवेळी फार संघर्ष केला आहे. या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, एकप्रकारे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळकटी मिळाली आहे. या नियुक्तीबद्दल बबनराव चौधरी यांचे जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.