बलात्कार करुन फरार झालेला “धाप दिल्या” शिरपूर पोलीसांच्या ताब्यात

बातमी कट्टा:- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला गुजरात राज्यातूं पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.घराबाहेर अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीच्या तोंडात रुमाल कोंबुन झाडाझुडुपांमध्ये उचलून घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला होता व तेथून तो सुरत फरार झाला होता.अखेर पोलीसांनी त्याला सुरत येथून ताब्यात घेतले आहे.

बघा व्हिडीओ

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील सराईत गुन्हेगार दिनेश सुदाम कोळी उर्फ धाप दिल्या याने अल्पवयीन मुलीवर दि 18 रोजी रात्री 12:15 वाजेच्या सुमारास बलात्कार केल्याची घटना घडली होती.अल्पवयीन मुलगी घराबाहेर झोपलेली असतांना तोंडात रुमाल कोंबुन उचलून घेऊन झात झाडाझुडुपांमध्ये तीच्यावर लैंगिक अत्याचार केला होता व तेथून तो फरार झाला होता.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिनेश सुदाम कोळी उर्फ धाप दिल्या विरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला.शिरपूर शहर पोलीसांकडून त्याचा सर्वत्र शोध सुरू असतांना गुजरात राज्यातील बारडोली येथील गंगाधरा रेल्वे स्टेशन परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

On YouTube

दिनेश कोळी ऊर्फ धाप दिल्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राज्यातील विविध जिल्ह्यांसह मध्यप्रदेश व गुजरात राज्यात देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बार्हे,गणेश कुटे,संदिप मुरकुटे, हेमंत खैरणार,उपनिरीक्षक छाया पाटील,शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी,मनोज पाटील ,रवींद्र अखडमल,विनोद अखडमल,गोविंद कोळी,योगेश दाभाडे,प्रशांत पवार,भटु साळुंखे, सचिन वाघ,आरिफ तडवी व मनोज दाभाडे आदींना केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: