बस आणि कारचा भीषण अपघात, स्विफ्ट कार चक्काचूर

बातमी कट्टा:- बस (एसटी) व स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला असून यात कार मधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.हा अपघात ईतका भीषण होता की यात कारचा पुढील भागाचा पुर्णता चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 24 रोजी धुळे तालुक्यातील वणी गावा जवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस व स्विफ्ट कारची समोरासमोर धडक झाली.चोपडा येथून अमळनेर मार्गे धुळ्याकडे येणाऱ्या एम एच 20,बीएल 3557 क्रमांकाच्या महामंडळच्या बस आणि एम.एच 19 डीजे 8442 क्रमांकाच्या कारची समोरासमोर जोरदार धडक झाली.घटनास्थळी तात्काळ उपस्थितांनी मदतकार्य करत स्विफ्ट कार मध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढत धुळे येथील हिरे महाविद्यालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले.यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहेत.

हा अपघात ईतका भीषण होता की कारचा समोरील भागाचा संपूर्ण चक्काचूर झाला तर एसटीचे पुढील भागाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: