बातमी कट्टा:- आज दि 27 रोजी दुपारी एस.टी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी चालकने आत्महत्या करत जिवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली असून एस.टी महामंडळाकडून कोरोनाकाळात अनियमित मिळणाऱ्या पगारामुळे आणि कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे मयत कर्मचाऱ्याचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.आर्थिक मदत झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंब आणि कर्मचारी संघटनेने निर्णय घेतला असून बसस्थानकात आंदोलन सुरु होते.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील साक्री राज्य परिवहन महामंडळ आगारातील कर्मचारी एस.टी चालक कमलेश बेडसे यांनी आज दि 27 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.चालक कमलेश बेडसे यांनी कोरोना काळानंतर अनियमित होणारी पगार आणि ओढवलेला आर्थिक संकटामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच साक्री आगारातील कर्मचाऱ्यांनी साक्री बसस्थानकात ठिय्या मांडत आंदोलनाला सुरुवात केली.आगारात आणि महामार्गावरील बसेस सोडून कर्मचारी साक्री बसस्थानकात एकत्र येत आंदोलन करत आहेत.आर्थिक मदत झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्याने निर्णय घेतला आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी एस.टी महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.