
बातमी कट्टा:- बातमी कट्टा न्युज पोर्टल वर बातमी झळकल्यानंतर कुठल्याही निधी व प्रशासनाची वाट न बघता सरपंचांनी त्या जिवघेना खड्डयाची दुरुस्ती केली आहे. सरपंचांनी तात्काळ निर्णय घेऊन काम केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
सविस्तर बातमी अशी की दि 19 रोजी वनावल येथील ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीवरुन बातमी कट्टा न्युज पोर्टलने बातमी प्रकाशित केली होती. वनावल येथे दोन महिन्यापासून गावाच्या मध्यभागी सार्वजनिक गटारीचा दुरुस्तीचा खड्ड्याचे खोदकाम करण्याच आल्याने ग्रामस्थ त्रस्त असल्याची बातमी बातमी कट्टा न्युज पोर्टलमध्ये प्रकाशित करण्यात आली होती.यानंतर वनावलचे सरपंच मनोहर पाटील यांनी तात्काळ बातमीची दखल घेत कुठलाही प्रशासनाचा निधीचा वापर न करता दि 20 रोजी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या गटारीचे काम पुर्ण केले.सरपंच मनोहर पाटील यांनी तात्काळ निर्णय घेऊन स्वखर्चाने गटारीचा जिवघेना खड्याचे दुरुस्तीचे काम केल्याबद्दल वनावल ग्रामस्थांनी समाधना व्यक्त केले आहे.
