बातमी कट्टा:- आषाढी एकादशी निमित्त शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील यात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांवर हातसफाई करणाऱ्या एका संशयित महिलेसह दोन अल्पवयीन मुला मुलीला शिरपूर पोलीसांनी ताब्यात घेत चोरीचे दोन मंगलपोत जप्त केले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर बाळदे येथे दि 10 रोजी रविवारी आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा देखील यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.प्रति पंढरपूर बाळदे येथे लाखोंच्या संख्येने भावीकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. यादरम्यान गर्दीचा फायदा घेत सराईत टोळी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगलपोत लांबवित होते.यावेळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस व शोध पथकाने यात्रेतील गर्दीतून उषा संजु काळे वय 25 रा.पिंपळगाव ता.भुसावळ या संशयित महिलेसह दोन अल्पवयीन मुलगा व मुलीला पोलीसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चोरीचे 12 हजार तीन मणी व मंगळसूत्र 04 वाट्या असे अंदाजे 3 ग्रँम वजनाचे आणि 16 हजार किंमतीचे 4 मणी व मंगळसूत्र 4 वाट्या असे चार ग्रँम वजनाचे मंगलपोत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई महिला पोलीस नुतन सोनवणे,रोशनी पाटील,अनिता पावरा शोध पथकाचे ललीत पाटील, लादुराम चौधरी,गोविंद कोळी, प्रविण गोसावी,आण्णा कोळी, मनोज दाभाडे,विनोद अखडमल,प्रशांत पवार आदींनी केली आहे.