
बातमी कट्टा, अमोल राजपूत 9404560892:- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.विधानसभा निवडणूकीसाठी तारखा जाहीर झाल्या नसतील तरी इच्छुक उमेदवार मात्र कामाला लागल्याचे दिसत आहेत. शिरपूर विधानसभा निवडणुकीत बिजेपी विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत असणार आहे.मात्र महाविकास आघाडीतील कुठल्या पक्षातील कोण उमेदवार असतील यावर तर्कवितर्क लावण्यात येत आहे.बिजेपी पक्षाच मात्र उमेदवारी बाबत ठरलेलं दिसत आहे.

शिरपूर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात बिजेपी समोर महाविकास आघाडी उतरणार आहे.मात्र महाविकास आघाडीतील कुठला पक्ष शिरपूर विधानसभा लढण्यास इच्छुक आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. बिजेपी पक्षाकडून आमदार काशिराम पावरा हेच पुन्हा उमेदवारी करतील अशी चर्चा सुरु आहे मात्र त्यांच्या समोर महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते यावर तालुक्यातून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
शिरपूर तालुक्यातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी करण्यासाठी काही नावे समोर आली आहेत त्यात शिवसेना उबाठा गटा तर्फे अत्तरसिंग पावरा, कॉंग्रेस पक्षातर्फे मनोज पावरा,विलास पावरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे डॉ जितेंद्र ठाकूर आणि दत्तू पाडवी यांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे.

आमदार अमरिशभाई पटेल कॉंग्रेस पक्षात असतांनाच शिरपूर तालुका हा कॉंग्रेसचा बाल्लेकीला म्हणून ओळखला जात होता.यामुळे शिरपूर तालुक्यात कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते असे म्हणू शकतो मात्र या विधानसभा निवडणुकीत शिरपूर विधानसभेला महाविकास आघाडी पक्षाकढून कॉंग्रेस पक्षासाठी जागा सुटेल की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा मिळेल याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही.
शिरपूर तालुक्यात आमदार अमरिशभाई पटेल यांची एकहाती सत्ता आहे असे म्हटले जाते.मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बघितले तर शिरपूर तालुक्यातून बिजेपीला फक्त १५ हजारांचा लिड मिळाला आहे.ज्यात आमदार अमरिशभाई पटेल,आमदार काशिराम पावरा,माजी खासदार हिना गावीत ,रंधे कुटूंब आणि,बिजेपी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी या सर्वांनी बिजेपी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. तालुक्यातील मोठी राजकीय ताकद बिजेपी पक्षाकडे असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत शिरपूर तालुक्यातून १ लाखांचा लिड मिळेल असे देखील बिजेपी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांनी भर सभेत सांगितले होते.मात्र निकालानंतर वेगळेच चित्र बघायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुक्यातील आदीवासी भागात कॉंग्रेस पक्षाने लिड घेतला होता.
लोकसभेचा निकाल डोळ्यासमोर ठेऊन आपण बघितले तर शिरपूर तालुक्यात महाविकास आघाडीकडून सक्षम उमेदवार असल्यास बिजेपी विरुद्ध महाविकास आघाडीकडून काटे की टक्कर बघायला मिळेल अशी चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडी तालुक्यातून कुठल्या पक्षाला आणि कोणाला संधी देते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.