बिबट्याची शेतकऱ्यांमध्ये दहशत, वनविभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन….

बातमी कट्टा:- दि ३ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात कामासाठी जाणाऱ्या मजुरांना बिबट्या दिसल्याने शेतात काम करणारे मजूर हातातले काम सोडून सैरावैरा पाळायला लागले होते,  यानंतर वनविभाग शिरपूर चे वनपाल पी एच माळी यांचेसह राउंड स्टाप, व नेचर कँझर्वेशन फोरम चे योगेश वारुळे हे घटनास्थळी येऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व दि ३ ऑक्टो पासून  वनविभागाचे कर्मचारी हे परिसरात गस्त करीत आहेत. एवढ्यावर न थांबता वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम साहेब, वन्यजीव संरक्षण संस्था ( नेचर कँझर्वेशन फोरम) चे सदस्य योगेश वारुळे, वनपाल पी एच माळी, वनपाल कपिल पाटील, वनरक्षक देसले, विवेक सोनवणे, यांनी सावळदे गावात शेतकऱ्यांची सभा बोलावून त्यांना बिबट या वन्यप्राण्याबद्दल सखोल माहिती दिली, तसेच त्यांच्यापासून आपला व आपल्या पाळीवप्राण्यांचा बचाव कसा करायचा व त्यांचेही संरक्षण कसे करायचे याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
           याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम, नेचर कँझर्वेशन फोरमचे योगेश वारुळे, वनपाल पी एच माळी, वनपाल कपिल पाटील, वनरक्षक राहुल देसले, विवेक सोनवणे, कार्यालयीन सहाय्यक योगेश्वर मोरे, सरपंच अनिल दोरीक, उपसरपंच सचिन राजपूत, यांच्यासह शेतकरी व  ग्रामस्थ उपस्थित होते.

आनंद मेश्राम – वनपरिक्षेत्र अधिकारी,वनविभाग शिरपूर,

         नागरिकांमध्ये वन्यप्राण्याची दहशत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीकामाची लगबग सुरू झाली आणि त्यातच बिबट्याचे शेतात दर्शन होणे हे अधिक संकट शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तरी वनविभागाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, तसेच वनविभागाचे २ कर्मचारी आम्ही गस्त साठी नेमणूक करीत आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.

योगेश वारुळे-सदस्य-नेचर कँझर्वेशन फोरम, शिरपूर
    
       बिबट हा भित्रा प्राणी असून एकाएकी माणसावर हल्ला करीत नाही, तरीही न पाहिलेला बिबट व त्याबद्दल ऐकलेली माहिती यातूनच शेतकरी घाबरले आहेत, बिबट आवाजाला घाबरतो, विशेषतः फटाक्यांचा आवाज. अशात शेतात करीत असतांना गाणे वाजविणे, फटाके वाजविणे, शक्यतो समूहाने काम करणे, आपल्या आजूबाजूला गोणपाटावर ऑइल व चटणीची पुळ टाकून जाळून धूर करणे याप्रकारे आपण बिबट किंवा अन्य वन्यप्राणी पासून बचाव करू शकतो. एवढे करूनही जर बिबट अचानक समोर आला तर हात वर करून मोठ्याने आवाज काढायचे, जेणेकरून तो घाबरून जागा सोडेल. बिबट त्याच्या उंचीपेक्षा मोठ्या शिकारवर हल्ला करीत नाही.

सचिन राजपूत – उपसरपंच – ग्रामपंचायत सावळदे,
     
        शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी व बिबट्या आपल्या शेतात आल्याबाबत अवगत करण्यासाठी परिसरात वनविभागाचे कर्मचारी नेमून सहकार्य करावे जेणेकरून भीतीपोटी शेतात शेतकरी व मजूर जाण्यास धजावतील. यातून घाबरून न जाता शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांचे देखील संरक्षण करणे तितकेच गरजेचे आहे, शेतकऱ्यांनी शेतात तारेला करंट सोडून मारण्याचा प्रयत्न करू नये, हा अपराध असून त्यास शिक्षा ही आहे.

WhatsApp
Follow by Email
error: