
बातमी कट्टा:- बिबट्याने सहा वर्षीय बालकाला ठार केल्याची दुर्दैवी घटना ऐन दसरा सणाच्या दिवशी घडली.संतप्त ग्रामस्थांनी बालकाचे पार्थिव थेट धुळे-सोलापूर महामार्गावरील शिरुड चौफुलीवर आणत रास्तारोका आंदोलन केले.तीन दिवसांपूर्वी देखील एका बालकाला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती.
धुळे तालुक्यातील बोरकुंड नजिक असलेल्या होरपाडा शिवारात होरपाडा शिवारात दीपक रोकडे परिवारासह कापूस वेचणीसाठी गेले होते. दुपारी घरी येत असताना बिबट्याने सहा वर्षीय स्वामी दीपक रोकडे या बालकाला उचलले नेले. आरडाओरडा केल्यानंतर त्याची बिबट्याने स्वमीची सुटका केली.मात्र तोपर्यंत स्वामी ठार झाला होता. ही घटना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधला मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी स्वामीचे पार्थिव थेट धुळे सोलापूर महामार्गावर आणले.यानंतर वनविभाग प्रशासन खळबळून जागी होत सायंकाळी उशीरा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
तीन दिवसांपुर्वी बोरकुंड जवळील नंदाळे शिवारातही आदिवासी बालकाला बिबट्याने उचलून नेत ठार केले होते. त्यानंतरही वनविभागाने दुर्लक्ष केले होते.महिन्याभरापासून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी होवून देखील वनविभाग लक्ष देत नसल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.
