बोगस डॉक्टरांवर खऱ्या डॉक्टरांची संक्रांत

बातमी कट्टा:- आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरूध्द कारवाई केली असून तीन डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील बोगस मुन्नाभाई डॉक्टरांविरुद्ध सुरु असलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दि 13 रोजी दुपारी शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथे मंगल शुभम हिरा रा.पश्चिम बंगाल हा ऍलोपॅथी औषधोपचार करण्याचा कुठलाही परवाना नसतांना व मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडील रजिस्ट्रेशन परवाना नसतांना गुरुवारी उमर्दा गावात एका झोपडीत रूग्णांवर औषधोपचार करत असतांना मिळुन आला त्याच्या ताब्यात ऍलोपॅथी औषधांचा साठाही आढळून आला आहे. तसेच बोराडी येथे देखील विजय धुडकू बडगुजर रा.बन्सीलालनगर शिरपूर हा देखील एका घरात रूग्णांवर औषधोपचार करत असतांना आढळून आला तर बोराडी येथेच भगवान कांतिलाल बडगुजर हा एका घरात रूग्णावर उपचार करतांना आढळला.तीघांकडेही ऍलोपॅथी औषधोपचार करण्याचा परवाना मिळुन आला नाही. या तिघांविरुध्द तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. भरत पावरा यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई बोगस डॉक्टर शोध पथकातील डॉ विक्रम वानखेडे, डॉ संजय मोरे,डॉ राजेंद्र बागुल ,डॉ भरत पावरा, डॉ. संदीप वळवी,डॉ. मनोज पाटील, एस.आर. वानखेडे , रूषिराज महाजन,अविनाश बडगुजर, श्याम पावरा आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: