बोरगांव ग्रामपंचायत कार्यालयात ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचे काम चालू

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोरगांव ग्राम पंचायत कार्यालयात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना’ फॉर्म भरण्याचे काम सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली चालू झाले आहे. ही योजना 1 जुलै 2024 पासून जशी चालू झाली तशी दलालांनी खेडे गावातील गोर गरीब महिलांची लुबाडणूक करणे चालू केले आहे. योजनेच्या लाभासाठी गावातील मोल मजूरी करणाऱ्या महिलांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून सरपंच योगेंद्रसिंग सिसोदियांनी गावातच ग्रामपंचायत कार्यालयात सदरहू योजनेचे फॉर्म भरणेसाठी कॅम्प लावला आहे.

राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे हा या योजनाचा हेतू आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. महिलेला आधार लिंक केलेल्या अकाऊंट मध्ये हे पैसे मिळणार आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक योजनेचा जर लाभ मिळत असेल आणि तो १,५०० रुपया पेक्षा कमी असेल तर फरकाची रक्कम महिलांनी दिली जाणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत बोरगांव गावातील 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलवून त्यांचे फॉर्म भरले जात आहे.यासाठी माजी शिक्षणमंत्री श्री अमरीशभाई पटेल व आमदार श्री काशिराम पावरा यांच्या आमदार कार्यालयातील ‘विकास योजना आपल्या दारी’ व ‘भूपेशभाई फ्रेंड सर्कल’ चे सहकार्य लाभत असल्याचे सरपंचांनी सांगितले.

या प्रसंगी सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, ग्रामसेवक पी बी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दीपक राजपूत, पांडुरंग कोळी, रोहिदास न्हावी, बापू भिल, शिपाई धुडकु भिल व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: