बोरगांव मराठी शाळेत प्रवेशोत्सव मेळावा

शिरपूर: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरगांव, केंद्र जातोडा येथे शाळापूर्व तयारी मेळावा-2 चे आयोजन करण्यात आले तसेच विद्यार्थांना मोफत वही-पुस्तकं व शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प न देता त्यांना वही-पुस्तक देण्यात यावे ही संकल्पना शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मनिषा वानखेडे यांनी मांडली होती त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना वही-पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. पालकांना चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमा बाबत शिक्षक गणेश पाटील यांनी माहिती दिली.

या प्रसंगी बोरगांवचे उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू भिल, ग्रामसेवक पी बी सोनवणे, पोलीस पाटील मनोहर पाटील, माजी सरपंच विजय भिल, भिमसिंग राजपूत, पिरन न्हावी, रुपचंद भिल, अंगणवाडी मदतनीस सुरेखा जोशी, विद्यार्थी-पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.शिक्षक गणेश पाटील यांनी शाळापूर्व तयारी मेळावा 2 चे प्रास्ताविक केले तर मुख्याध्यापिका अनिता जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

WhatsApp
Follow by Email
error: