बोरगाव ग्रामपंचायत तर्फे कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोरगाव ग्राम पंचायत तर्फे 15 ऑगस्ट – 75व्या स्वातंत्र्य दीनाच्या शुभमुहूर्तावर गावातील कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना काळात आपले कर्तव्य प्रामाणिक पणे बजविणाऱ्या आशा पर्यवेक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत शिपाई, माजी सैनिक, वायरमन – अनुक्रमे सौ मनिषा पाटील, सौ निकिता जोशी, श्रीमती सुरेखा जोशी, श्री धुडकू भिल, श्री दगेसिंग राजपूत व श्री अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच 10वी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा गुणगौरण सोहळ्याचे आयोजन ग्राम पंचायत कार्यालयात करण्यात आले होते.

सर्वप्रथम उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर सरपंच सौ काशिबाई भिल, ग्राम पंचायत सदस्या सौ विमलबाई राजपूत, ग्रा पं सदस्य श्री पांडुरंग कोळी, श्री तानकू उखडू भिल यांच्या शुभ हस्ते कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस पाटील मनोहर पाटील, विठ्ठल झुलाल कोळी, सोसायटी चेअरमन खंडू राजपूत, माजी उपसरपंच नानेसिंग राजपूत, कौतिक तोताराम येशी, रोहिदास कोळी, दीपक राजपूत, कृषी सेवक के. आर. चव्हाण, जयराम पोपट पाटील, प्रकाश न्हावी, गुलाबसिंग राजपूत, सुभाष न्हावी, लखा धनगर, बाबुराव बोरगावकर, प्रविण धनगर, मराठी शाळा मुख्याध्यापक श्रीमती अनिता जाधव, शिक्षक श्री गणेश पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्राम पंचायत तर्फे अशा पद्धतीने पहिल्यांदाच सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले तसेच कोरोना मुक्त गाव बोरगावच्या या अभिनव उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: