बातमी कट्टा:- महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा ३.० अभियानात बोराडी गावाने प्रथम क्रमांक पटवकला आहे. मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्रींसह ,विधानसभा अध्यक्ष, महसूल मंत्रीच्या हस्ते बोराडी गावाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आज दि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत असतो.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडून आज शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाला महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा ३.० अभियानात प्रथम क्रमांक घोषित करुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे ,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभेच्छा हस्ते मुंबई येथे सत्कार करण्यात आला यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे, बोराडी गावाचे सरपंच सुकदेव भिल,या अभियानात ज्यांनी खूप परिश्रम ते उपसरपंच राहुलजी रंधे,जि.प उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, ग्रामविकास अधिकारी डी आर पेंढारकर यांचा व्यासपीठावर सन्मान करण्यात आला, या प्रसंगी मुंबई येथे शिरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय सोनवणे, संजय गुजर, शेखर माळी, गजू पाटील, रितेश सोनवणे आदी उपस्थित होते.