ब्राउन शुगरची तष्करी,एकाला घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:- ब्राउन शुगर तस्करी करणाऱ्या संशयिताला नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. संशयितरीत्या पिशवी उभा असतांना याला पोलीसांनी ताब्यात घेत त्याच्या जवळील अंदाजे 7 ते 8 लाख रुपये किंमतीचा 500 ग्रँम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी उपनगर शिवारात असलेल्या रेसिडन्सी हॉटेलसमोर नाशिक परिक्षत्रचे विभागीय विशेष पोलीस उपमहानिरीक्षक पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक बी.जी.रोहन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोकॉ फिरोज पठाण, नितीन सपकाळे, मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिर्झा यांना मिळालेल्या गोपणीय माहिती नुसार दि 9 रात्री सायंकाळी 8 वाजेदरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर रेसीडन्सी पार्कसमोर सापळा रचला होता. यावेळी हातात पिशवी घेवून संशयास्पद रित्या उभा असलेला एकाला पथकाने ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने आपले नाव राजू उर्फ सय्यद शेख बुडन (३०) रा.जाम मोहल्ला भुसावळ, जि.जळगाव, असे सांगितले. पथकाला त्याच्या ताब्यात ५०० ग्रॅम वजनाच्या पिशवीत ब्राऊन शुगर असल्याचे आढळून आले. पथकाने संशयिताच्या ताब्यातील अंदाजे 8 लाख किंमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: