ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रक टोलनाक्यावर धडकला…

बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील शिरपूर शहराजवळ ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रक शिरपूर टोल नाकाच्या कॅबिनवर वर जाऊन धडकत कॅबिनवर उलटल्याची घटना आज दि १७ रोजी सायंकाळी सुमारास घडली आहे.सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही.अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहराजवळील शिरपूर टोलनाका येथे प्रतिमपुरा मध्यप्रदेश येथून पुण्याकडे साबण घेऊन जाणाऱ्या एम एच १८ बिजी ५४१४ क्रमांकाची भरधाव ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट टोलवेच्या कॅबिनला जाऊन धडकत कॅबिनवर जाऊन उलतली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांसह टोलवे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले.ट्रक चालक सुनिल गोरे व सहचालक मोहब्बत नागत यांना ट्रक मधून बाहेर काढण्यात आले. या अपघाता टोलवेच्या दोन कॅबिन अक्षरशः चक्काचूर झाले.घटनेनंतर काही काळ शिरपूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने अपघातात जिवीतहानी टळली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: