भयंकर मृत्यू,चिरडल्याने शीर झाले धडावेगळे..

बातमी कट्टा:- धुळे येथील तरुणाचा शिंदखेडा तालुक्यातील होळ रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे पटरीवर छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.त्या मृत तरुणाने आत्महत्या केल्याचा संशयित व्यक्त करण्यात आला असून रेल्वेखाली आल्याने चिरडल्याने शीर धडावेगळे झाले.घटनास्थळी नरडाणा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि १८ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील होळ रेल्वे स्टेशनच्या पुढे रेल्वे पटरीवर एकाचा मृतदेह आढळून आला होता.रेल्वेखाली आल्याने घटनास्थळी चिरडल्याने शीर धडावेगळे अवस्थेत मृतदेह आढळून झाला होता.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नरडाणा पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोहैकॉ भुषण खेडवण आणि पोना भरत चव्हाण घटनास्थळी धाव घेतली. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेहाजवळ पडलेल्या मोबाईलमुळे मृतदेहाची ओळख पटली.धुळे येथील राकेश कौतीक पाटील वय ३६ रा.जिटीपी स्टॉप,जी बी बडगुजर कॉलनी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.राकेश पाटील याचा मृतदेह पोलीसांनी नरडाणा येथील आरोग्य केंद्रात दाखल केला.प्रथमदर्शनी राकेश पाटील याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.याबाबत नरडाणा पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: