बातमी कट्टा: खरीप हंगाम 2021- 22 मध्ये राज्य शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने भरडधान्य (मका, ज्वारी तथापि बाजरी) खरेदी करीता NEML पोर्टलवर ऑनलाईन (online) पध्दतीने नोंदणी प्रक्रिया 3 सप्टेंबर 2021 पासून सुरू आहे. त्यासाठी 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम. एस. सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
या वर्षी सातबारावर ऑनलाईन ई पिकपेरा नोंद आहे. शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचीत राहू नये म्हणून शासनाने नोंदणी कालावधी 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविला आहे. शेतक-यांनी खरीप हंगाम 2021- 22 मधील ऑनलाईन पीकपेरा नमूद असलेल्या सातबारा उताऱ्याची मूळप्रत, आधारकार्ड झेराक्स, बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादीची माहिती वरील दर्शवलेल्या ठिकाणी नोंदणी करावी. शासनाचे खरेदी आदेश मिळाल्यावर शेतक-यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस. एम. एस. द्वारे (SMS) माल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. प्रत्येक शेतक-याकडून फक्त त्यांच्या कुटुंबातीलच (आई, वडील, मुलगा, मुलगी, पत्नी, पती) सातबारा उतारा ओळख पटविल्यानंतर स्वीकारण्यात येईल याची सर्व शेतक-यांनी नोंद घ्यावी.