भरदिवसा बॅगीतून सोने चांदीचे दागिने चोरीला….

बातमी कट्टा:- शहरातील गजबजलेल्या ठिकाणावरुन तरुणीच्या बॅगीतून 6 ग्रँम सोन्याची मंगलपोत सह पायातील साखळी चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सि.सि.टी.व्ही फुटेज मध्ये चित्रीत झाले आहे.

शिरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमागे आज सोमवारी सकाळी 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास पुजा प्रविणसिंग राजपूत रा.वडली ता.शिंदखेडा या तरुणीने सोबत आणलेले सोन्याची पोतचे काम करुन नंदुरबारकर सोनार यांच्या दुकानातून चांदीचे साखळ्या घेऊन जवळील बॅगीत ठेवले.6 ग्रँम वजनाची सोन्याची पोत व चांदीच्या साखळ्या बॅगीत ठेऊन पुजा राजपूत ही आर. ए. महिला स्टोअर्समध्ये गेली.तेथे काही वस्तू घेऊन बॅगीतून पैसे काढतांना बॅगची चैन उघडी दिसून आली. बॅगची तपासणी केली असता बॅगीतून 6 ग्रँम सोन्याची पोत,चांदीचे साखळ्या व रोख रक्कम चोरीस गेल्याचे समजले.
घटनेची माहिती प्राप्त होताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले.घटनेची चौकशी करत परिसरातील सी.सी.टी.व्ही कँमेरेचे फुटेज तपासण्यात आले. दुपारी उशिरापर्यंत चौकशीची करावाई सुरु होती.

WhatsApp
Follow by Email
error: