
बातमी कट्टा:- भरधाव चारचाकी कारचा ब्रेकफेल झाल्याने कार थेट जिल्हा क्रिडा संकुलातील तळमजल्यातील दाबेली सेंटरमध्ये जाऊन धडकल्याची घटना दि 29 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली यात दाबेली सेंटरमधील ग्राहकांसह कार मधील चार जण असे एकुण सहा जण जखमी झाले यात एक व्यक्ती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
धुळे मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 29 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास श्याम भगवान चौधरी हे त्यांच्या कुटूंबासोबत एम.एच. 15 सीएम 6934 क्रमांकाच्या कारने वाडीभोकर रोडने जात असतांना कारचा अचानक ब्रेक फेल झाल्याने कारचे नियंत्रण सुटल्याने कार थेट जिल्हा क्रिडा संकुलातील तळमजल्यातील मयुरी दाबेली सेंटरवर जाऊन धडकली.अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी कारमधील श्याम भगवान चौधरी ,अन्नपूर्णा चौधरी,लक्ष्मण चौधरी,हिराबाई बोरसे यासह दाबेली सेंटरवरील ग्राहक जखमी झाले.नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.यात एक गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली.