बातमी कट्टा:- इंदौरहुन धुळ्याकडे जाणाऱ्या चार चाकी कारचा रात्री 12:30 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात एकाचा जागिच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.तिघांनाही धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर मयताला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गा जवळील शहादा फाट्या जवळील संगम हॉटेल जवळ रात्री 12:30 वाजेच्या सुमारास इंदौर मध्यप्रदेश कडून धुळ्याकडे जाणाऱ्या एम एच 45 ए क्यु 2003 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. यात वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.हि भरधाव चारचाकी कार समोर चालणाऱ्या ट्रकच्या मागून धडकली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांसह शिरपूर टोलनाका येथील रुग्णवाहिका दाखल होत जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.यात रमेश सखाराम भास्कर वय 30 सखाराम सदाशिव भास्कर वय 65 व नानासाहेब जगन्नाथ चुंगे वय 62 हे गंभीररीत्या जखमी असल्याने त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे पुढील उपचारासाठी पहाटे रवाना करण्यात आले तर मौलाली सुलतान शेख वय 50 रा.चिंचोली काजळे ता आवसा जि.लातूर यांचा 2:30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
मयत मौलाली शेख हे आयुर्वेदिक डॉक्टर होते.ते मित्रासोबत औषधांसाठी मध्यप्रदेश गेले होते.मयत मौलाली शेख यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,भाऊ असा परिवार होत.या अपघातात
वाहन चालक रमेश सखाराम भास्कर यांची प्रकृती चिंताजनक असून सखाराम सदाशिव भास्कर वय 65 तर
नानासाहेब जगन्नाथ चुंगे जखमी 62 हे गंभीर आहेत.घटनेची माहिती मिळताच मयत मौलाली शेख यांच्या पत्नी व नातेवाईक शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.