बातमी कट्टा:– धुळे येथे भरधाव टँकरने अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ओमनी,रिक्षा आणि दुचाकी वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून अपघात किती जण जखमी झाले आहेत याबाबत पोलीसांकडून तपास सुरु आहे.
गुजरातकडून येणाऱ्या भरधाव टँकरने धुळे शहरातील संतोषी माता चौक ते फाशीपूल या रहदारीच्या रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना आज दि ७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात चारचाकी ओमणी,रिक्षा व दुचाकी वाहने अक्षरशः चक्काचूर झाले आहेत.या अपघातात प्रकाश मुलानी यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत पोलीसांकडून तपास सुरू असून मद्यपी टँकर चालक शिशणरण गोते याला धुळे शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील चौकशी सुरु आहे.