भरधाव ट्रकने दोघांना चिरडले , हनुमान भक्तांवर काळाचा घाला !!

बातमी कट्टा:- दोन जणांना ट्रकने चिरडल्याची घटना आज दि 13 रोजी सकाळच्या सुमारास घडली यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघे ही श्रावणमास शनिवार निमीत्त धुळ्याहून आर्वी शिवारातील रोकडोबा हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात असतांना घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान शिवारात श्रावणमास शनिवार असल्याने धुळे येथून आर्वी शिवारातील रोकडोबाला पायी जाणाऱ्या हनुमान भक्तांवर आज दि 13 रोजी सकाळी काळाने घाला घातला.धुळे येथील गल्ली नंबर 6 मध्ये असलेल्या नवभारत चौकात रहाणारे राजु विश्वनाथ वाघारे वय 50 व किशोर मधुकर थोरात वय 47 हे दोन्ही हनुमानभक्त श्रावणमासा निमीत्त दर वेळेस प्रमाणे शनिवारी पहाटे आर्वी येथील रोकडोबा हनुमानाला पायी जात असताना सकाळच्या सुमारास अवधान शिवारातील आयसीआयसीआय बँकेसमोर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दोघांना चिरडले.यात राजु वाघारे यांचा जागीच मृत्यू झाला तर किशोर थोरात हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असतांना किशोर थोरात यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर मालेगाव येथील महामार्गा पोलीसांनी एमपी 09 ए एच 9361 क्रमांकाच्या ट्रकला ताब्यात घेतला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: