भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू…

बातमी कट्टा:- भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलीला दिलेल्या जोरदार धडकेत मोटरसायकल चावकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 25 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील धावडे येथील नारसिंग पोलादसिंग गिरासे वय 39 हे आपल्या एम एच 18 बी 5381 क्रमांकाच्या मोटरसायकलीने दोंडाईचाकडून शिंदखेडाच्या दिशेने जात असतांना शिंदखेडा येथून भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच 18 झेड 9875 क्रमांकाच्या ट्रॅक्टरने नारायसिंग गिरासे यांच्या मोटरसायकलीला जोरदार धडक दिली.

यात नारायसिंग गिरासे रस्त्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून घटनास्थळावरुन फरार झाला.मयत नारसिंग गिरासे यांचे मोठे भाऊ जोतेसिंग गिरासे यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.नारसिंग यांच्या पश्चात पत्नी,आई, वडील, दोन भाऊ एक मुलगा एक मुलगी असा परिवार होत.

WhatsApp
Follow by Email
error: