मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर उभा असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनासमोर स्वताहुन झोकून दिल्याने 35 वर्षीय मनोरुग्ण व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि 21 रोजी सकाळी घडली आहे.प्रवीण हुकूमचंद पावरा वय 35 रा खंबाळे ता शिरपूर असे मयत झालेल्या मनोरुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रवीण हुकूम पावरा याच्यावर उपचारासाठी मध्यप्रदेशातील खरगोन येथे चुलत भाऊ मनोज सिलदार पावरा हा मंगळवारी सकाळी मोटारसायकलीने घेऊन जात असतांना तालुक्यातील सांगवी शिवारातील गायकवाड पेट्रोलपंप समोर प्रवीण पावला यास उभे करून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता उभा असलेल्या प्रवीण पावराने महामार्गावरील एका वाहनासमोर जाऊन स्वतः ला झोकून दिल्याने अपघात झाला या अपघातात प्रविण हुकूम पावरा हा जागीच मयत झाला त्यास महामार्ग रुग्णवाहिकेने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.कदम याने मृत घोषित केले.याप्रकरणी वार्डबॉय प्रवीण पाटील याने तालुका पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढिल तपास पोहेकॉ आर एस मांडगे करीत आहे.