बातमी कट्टा:- भाजप पक्षाकडून बबनराव चौधरी यांना आणखी एका मोठ्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.भाजपच्या रदेश उपाध्यक्ष पदी बबनराव चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपाचे धुळे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच भाजप पक्षाचे प्रदेश सदस्य बबन चौधरी यांच्या कामाची दखल घेत भाजप पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बबन चौधरी यांनी प्रदेश उपाध्यक्ष पधी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
निवडीच्या पत्रात म्हटले की,मागील काळात पक्ष संघटनेतील विविध जबाबदाऱ्या तसेच लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचा तसेच व्यापक अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यावढीसाठी होईल असे पत्रात म्हटले आहे.