भाजप पक्षाला “जय महाराष्ट्र “!, माजी नगरसेवक हेमंत पाटील यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडूकीचा मार्ग मोकळा

बातमी कट्टा:- नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते,माजी पदाधिकारींसह शिरपूरचे पाच माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबई येथे एकूण पाच माजी नगरसेवक, एक समाजकल्याण सभापती, तसेच गावांच्या सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जनसंघाच्या काळापासून भाजपसोबत राहिलेल्या या कार्यकर्त्यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.जनसंघाचे माजी आमदार कै.प्रल्हाद पाटील यांचे नातू, माजी नगरसेवक आणि माजी भाजप शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर माजी नगरसेवक राजेंद्रसिंग गिरासे यांनी देखील पक्ष प्रवेश केला आहे.विशेष म्हणजे पंचायत समितीचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती वसंत पावरा यांनी देखील आज पक्षप्रवेश केला आहे.बाजार समितीचे संचालक प्रसाद पाटील यांचा ही शिंदे गटाच्या शिवसेना पक्षात प्रवेश झाला करण्यात आला आहे.

भाजपमध्ये आमदार अमरिशभाई पटेल यांच्या २०१९ भाजप प्रवेश झाला होता प्रवेशानंतर जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची कोंडी झाल्याची नाराजी गेल्या काही महिन्यांपासून व्यक्त होत होती. कार्यकारिणीत जुन्या कार्यकर्त्यांना स्थान न दिल्याने आणि निर्णय प्रक्रियेत त्यांना विश्वासात न घेतल्याने अनेकांनी असंतोष व्यक्त केला होता. अखेर हा असंतोष उफाळून आला असून अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर नगरपालिका निवडणुकीत शिरपूर शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर नगरपालिका निवडणुकीत शिरपूर शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.भाजपच्या संघटनात्मक पातळीवर मोठी धांदल उडाली असून, पुढील काही दिवसांत आणखी काही कार्यकर्ते पक्ष बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: