
बातमी कट्टा:- सिक्कीम येथे कर्तव्यावर असतांना अपघात होऊन दरीत कोसळल्याने शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील भरातीय सैनिक जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे.मनोज संजय माळी अस शहीद जवानाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील मनोज संजय माळी हे चार वर्षा पुर्वी भारतीय सैन्यात भरती झाले होते.मनोज माळी यांनी एसपीडीएम महाविद्यालयात शिक्षण घेतले असून 2017 – 18 साली एसपीडीएम महाविद्यालयात मनोज माळी एनसीसी कॅडेट होते.काल दि 5 रोजी रात्री सिक्कीम येथे कर्तव्यावर असतांना वाहनांना मार्गदर्शन करत असतांना अपघात झाला यादरम्यान पाय घसरून जवान मनोज माळी हे दरीत कोसळल्याने शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.जवान मनोज माळी यांची घराची परिस्थिती हलाखीची असून वडील शेतकरी तर मोठे भाऊ कंपनीत कामाला आहेत.शहीद जवान मनोज माळी यांचे पार्थिव केव्हा व कुठल्या मार्गे येणार याबाबत अद्याप ठोस माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.
