भारतीय सैन्यदलातील जवानाला लडाखमध्ये विरमरण..

बातमी कट्टा:- कर्तव्यावर असतांना भारतीय सैन्य दलातील भडगाव येथील 29 वर्षीय जवान यांना विरमरण आले.याबाबत त्यांच्या घरच्यांना माहिती देण्यात आली आहे.

जळगांव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या टोणगाव येथील नीलेश रामभाऊ सोनवणे वय 29 हे 2010 मध्ये औरंगाबाद येथील झालेल्या भारतीय सैनिकांच्या भरतीत भरती झाले होते.त्यांनी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर उत्तराखंड आणि पुणे येथे कर्तव्य पार पाडून लेह लडाख येथे कर्तव्यावर असतांना त्यांना विरमरण आल्याची माहिती समोर आली आहे.याबाबतची घटना समजाच संपूर्ण गाव परिसरात शोककळा पसरली.भारतीय जवान निलेश सोनवणे यांच्या पश्चात आई व पाच भाऊ आहे त्यातील दोन भाऊ हे मुंबई पोलीस म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: