बातमी कट्टा:- भरधाव येणाऱ्या चारचाकी कार उभ्या ट्रॅक्टरला मागून धडकली.आज दि 1 रोजी दुपारी झालेल्या या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील सुराय गव्हाणे फाट्याजवळ भीषण अपघात घडला आहे.भरधाव वेगाने येणारी एम एच 02 डिएस 1277 क्रमांकाची व्हर्ना कार उभ्या ट्रॅक्टरला मागून धडकली या अपघातात कारमध्ये पुढे बसलेल्या दोन जणांचा तर ट्रॅक्टर वरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य करत गंभीर जखमींना धुळे रवाना केले.नरडाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून यातील जखमी व मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही.या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

