बातमी कट्टा:- प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा घाटात भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.मुसळधार पाऊसात बस घाटात पलटी झाल्याने मध्यरात्री मदतकार्य करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.या अपघातात चालकासह 18 महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पिंपळनेर कडून सुरत कडे जाणाऱ्या खासगी बसचा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात अपघात झाला.मुसळधार पावसात रस्त्याचा आंदाज न आल्याने जिजे 03 डब्ल्यू 9627 क्रमांकाची बस पलटी झाली.या बसमधून गुजरात येथे मजूरी कामासाठी जाणारे मजूल प्रवासी होते.या भीषण अपघातात 8 ते 10 प्रवाशी गंभीर जखमी झाले होते, बस खाली अडकलेल्या चालकाला मध्यरात्रीपर्यंत बाहेर काढण्याचे काम सुरु होते,तर ईतर जखमींना नवापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र यात चालकाचा आणि एका 18 महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुसळधार पाऊस सुरु असल्याने घटनास्थळी मदतकार्य करण्यात अडथळा निर्माण होत होती.घटनेची माहिती मिळताच प्रशासन,रुग्णवाहिकांसह नागरिकांनी धाव घेतल्याने मोठा अंनर्थ टळला आहे. अपघातस्थळी लहान मुले महिलांनी आक्रोश व्यक्त केला.सदर प्रवासी मालेगाव भागातील मजूर असून ते गुजरात राज्यातील जुनागड येथे जात होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.